
Alumni visit the school: An initiative to build cricket pitches for the students of Haribhai Devkaran School
सोलापुरातील नामांकित शाळा हरिभाई देवकरण प्रशाला या शाळेमधील 1978 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचे पीच तयार करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचा भूमिपूजन समारंभ शाळेच्या मैदानावर करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे,संचालक दामोदर भण्डारी,शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.